Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनिषा मांढरेने पेपर लिक करताना खबरदारी बाळगली, सर्व प्रश्न तोंडपाठमॉर्डन कॉलेजने केले निलंबित

मनिषा मांढरेने पेपर लिक करताना खबरदारी बाळगली, सर्व प्रश्न तोंडपाठ
मॉर्डन कॉलेजने केले निलंबित 

दिल्ली : खरा पंचनामा 

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणात अनेक नवनवीन धक्कदायक खुलासे समोर येत आहेत. नीट परीक्षा पेपर लिक करताना मॉडर्न कॉलेजची प्राध्यपक मनिषा मांढरे हिने खबरदारी बाळगलीयं.

नीट परीक्षेतील प्रश्न मांढरेचे तोंडपाठ होते. त्यामुळे नीट परीक्षेतील प्रश्न मांढरेने तोंडपाठ करुनच लिक केले असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे.

मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापक मनिषा मांढरे मागील अनेक वर्षांपासून बायोलॉजी विषय शिकवत होती. त्यामुळे या विषयाचा मांढरेचा गाढा अभ्यास होता. प्रश्न एकदा वाचले की, मांढरे लक्षात ठेवत होत्या. अर्थात मनिषा मांढरेला सर्वच प्रश्न तोंडपाठ होते. सीबीआयची तपास यंत्रणा सध्या लिखित डिजिटल साहित्याच्या मागावर असून मनिषा मांढरे हिने नेमकं कशा पद्धतीने प्रश्न लिक केले आहेत, याचा तपास सुरु आहे.

शिवराज मोटेगावकरने क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पी. व्ही कुलकर्णीची (केमिस्ट्री) एनटीएच्या प्रश्नप्रत्रिका कमिटीवर नियुक्ती करुन घेतली होती. तर मनिषा मांढरे (बायो) ही देखील प्रश्नपत्रिका बनवण्याच्या कमिटीवर होत्या. दोघेही प्रश्नपत्रिका फोडणार आणि मोटेगावकरपर्यंत पोहोचवणार अशी सोय करण्यात आल्याचा संशय सीबीआयला आहे. अर्थिक ताकदीच्या बळावर हा सुनियोजित कट आखल्याचाही सीबीआयला संशय आहे.

मॉर्डन कॉलेजमध्ये बायोलॉजी विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या मनिषा मांढरे हिला सीबीआयने अटक केल्यानंतर अखेर मॉर्डन कॉलेजच्या प्रशासनाकडून मनिषा मांढरे हिला निलंबन केलं आहे.

दरम्यान, नीट परीक्षा फुटी प्रकरणी सीबीआयने आरसीसी कोचिंग क्लासचे प्राध्यपक पी. व्ही कुलकर्णी आणि मॉर्डन कॉलेजच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केल्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरांचं नाव समोर आलं. त्यानंतर सीबीआयने सुरुवातीला मोटेगावकरची लातूरला जात साधी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मोटेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. यामध्ये डिलिट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर मोबाईलमधील प्रश्न आणि नीट परीक्षेतील प्रश्न अगदी तंतोतंत जुळले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.