Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पवारांना धक्का, मामाला चकवा देत तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

पवारांना धक्का, मामाला चकवा देत तनपुरेंचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता तनपुरे यांना अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तनपुरे यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतल्याचे म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला.

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात त्यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आज अखेर त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, 'त्यांचा भाजप प्रवेश झाल्याचं मी काही वेळापूर्वी ऐकलं. माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही. त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण त्यांनी त्यांच्या मतदासंघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं. त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली की नाही मला माहित नाही. मी त्यांना संपर्क केलेला नाही.

प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशावर बोलताना म्हटले की, 'आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी थेट बोलण्याची हिंमत झाली नाही. मी माझी भूमिका आणि भावना सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली होती.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.