देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी ! इंधन वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं खास पाऊल
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी विधानभवनात चक्क बुलेटवरून एन्ट्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर फडणवीस यांनी आपला ताफ्यातील वाहनांना घेऊन न जाता बुलेटवरून जाण्याचा निर्णय घेतला. आज मंत्रिमंडळाची बैठक होणर आहे, त्यासाठी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार दुचाकीवरून मंत्रालयात दाखल झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बुलेट चालवत विधानभवन गाठले. त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार हे देखील पाठीमागे बसलेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलिसांचा ताफा आणि सुरक्षा रक्षकही गाड्यांऐवजी बाईकवरूनच विधानभवन परिसरात दाखल झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि जनतेला इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.