Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी पोलीस महासंचालकांविरुद्धचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्दफडणवीस, शिंदेंना गोवण्यासाठी व्यावसायिकाला भाग पाडल्याचा आरोप

माजी पोलीस महासंचालकांविरुद्धचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द
फडणवीस, शिंदेंना गोवण्यासाठी व्यावसायिकाला भाग पाडल्याचा आरोप

मुंबई : खरा पंचनामा 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध विशिष्ट विधाने करण्यास व्यावसायिकाला भाग पाडल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा बुधवारी (ता. २०) उच्च न्यायालयाने रद्द केला.

व्यावसायिक संजय पुनामियांच्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांनी पांडेंविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, तर जगताप यांच्याविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पांडेंविरुद्ध दाखल गुन्ह्यानुसार त्यांनी पुनामियांच्या विरुद्धचा फौजदारी खटला पुन्हा उघड केला, तर जगताप यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांच्याविरुद्धच्या प्रलंबित खटल्यात कोणतेही अधिकृत नियुक्तीपत्र नसतानाही विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिल्याचा आरोप पुनामियांनी केला होता. पुन्हा तपास सुरू करण्यात आलेल्या फौजदारी प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचेही नाव होते. पुनामिया आणि सिंग या दोघांवरही खंडणी उकळल्याचा आरोप ठेवला होता.

गुन्हा रद्द करण्यासाठी पांडेंसह वकील शेखर जगताप आणि अन्य काहींनी स्वतंत्र याचिका केल्या होत्या. त्यांच्या याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर राखून ठेवलेला निकाल मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. सुमन श्याम यांच्या विशेष खंडपीठाने बुधवारी जाहीर केला.

पुनामियांच्या तक्रारीच्या आधारे ठाणे पोलिसांनी पांडेंसह दोन निवृत्त पोलिस अधिकारी आणि इतरांवर पुनामियांविरोधात खोटे जबाब देण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल केला होता. पुनामियांच्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये ते सैफी रुग्णालयात दाखल होते. त्या वेळी अन्य आरोपी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन पांडेंनी पाठवल्याचे सांगितले.

तसेच पांडेंनी त्यांना फडणवीस, शिंदे व परमबीर यांना गोवण्यास सांगितल्याचा निरोपही दिला. परंतु असे करण्यास नकार दिल्याने आपल्याविरुद्धचा खटला पुन्हा उघडल्याचा दावा पुनामिया यांनी केला होता.

तथापि हा गुन्हा दाखल करण्यात अकारण विलंब झाल्याचा आणि तो राजकीय सूडबुद्धीने दाखल केल्याचा दावा पांडेंच्या वतीने गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना करण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.