Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक पिस्तूल, काडतूस जप्त : एलसीबीची कारवाई

सांगलीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक 
पिस्तूल, काडतूस जप्त : एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली. विश्रामबाग येथील हसनी आश्रम ते कुंभार मळा रस्त्यावर सांगली एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत पिस्तूल, काडतूस असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

गोरखनाथ मारुती कदम (वय ४२, रा. गल्ली नं.८, श्रीरामनगर गल्ली, वानलेसवाडी, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर पिस्तूल पुरवणारा  सरदार (पूर्ण नाव नाही) (रा. कलघाट, मध्यप्रदेश) असे पसार झालेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीला दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तयार केले होते. 

पथक सांगलीतील विश्रामबाग परिसरात गस्त घालत असताना एकजण हसनी आश्रम ते कुंभार मळा रस्त्यावर पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून कदम याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने ते सरदार याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्याला अटक करून पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परीट, संदीप पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, विनायक सनदी, संकेत कानडे, अभिजीत माळकर, रोहन घस्ते, सूरज थोरात, सायबर पोलीस ठाण्याचे सतीश आलदर, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.