पश्चिम बंगालमध्ये मतदानातला नवा प्रकार समोर, सुप्रीम कोर्टाची ममतादीदींना थेट सूचना
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारूण पराभव झाला. भाजपने सरकार स्थापनही केलं आहे. पण, ममतदीदींना अजूनही आपला पराभव मान्य नाही. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. 31 अशा जागा आहे जिथे मतांमध्ये खूप कमी प्रमाण आहे. SIR मुळे तिथे फटका बसला. यावर आता सुप्रीम कोर्टानेही नव्याने याचिका दाखल करण्यास सांगितलं आहे.
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील निवडणुकीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. ३१ जागा अशा आहे तिथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कमी फरकाने पराभव झाला. SIR मुळेही इथंही परिणाम झाला आहेय हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला. याबद्दल तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि वकील कल्याण बनर्जी यांनी हीच बाब जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमल्या बाग यांच्या खंडपीठापुढे मांडली.
हे खंडपीठ बंगालमधील SIR लागू केलेल्या निर्णयावर सुनावणी सुरू आहे. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बंगालमधील इतर नेते हे बंगालमध्ये लावलेल्या स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन अर्थात SIR च्या विरोधात नवीन याचिका दाखल करू शकतात'
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा ८६२ मतांनी पराभव झाला आणि त्याच मतदारसंघामध्ये 5000 जणांची नाव ही मतदान यादीतून हटवण्यात आली होती, अशी माहिती कल्याण बॅनर्जी यांनी कोर्टात दिली. तसंच, TMC आणि भाजपमध्ये एकूण 32 लाख मतदारांचं अंतर आहे आणि वोट डिलीशनच्या विरोधात 35 याचिका अजून पेंडिंग आहे.
तर, निवडणूक आयोगाने या आरोपाचं खंडन केलं आहे. अशा प्रकरणामध्ये निवडणूक आयोगामध्ये एक याचिका दाखल केली पाहिजे. SIR आणि त्यासंदर्भात असलेल्या वादावर या प्रक्रियेअंतर्गत उत्तर देण्यासाठी एक ठिकाण निश्चित केलं जाईल.
दरम्यान, सध्याच्या वेगाने अपीलीय न्यायाधीकरणांना ही अपीले निकाली काढण्यासाठी सुमारे ४ वर्षे लागू शकतात, असं तृणमूल काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी न्यायालयाला सांगितलं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने २९४ पैकी २०७जागा जिंकल्या आहेत, तर टीएमसीला ८० जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राज्यात ९० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. भाजपला एकूण २ कोटी ९२ लाख २४ हजार ८०४ मते मिळाली आहेत, तर तृणमूल काँग्रेसला २ कोटी ६० लाख १३ हजार ३७७ मतं मिळाली आहेत.
भाजपला टीएमसीपेक्षा ३२ लाख ११ हजार ४२७ मतं जास्त मिळाली आहेत. म्हणजेच २९३ जागांच्या हिशोबात भाजपला प्रत्येक जागेवर सरासरी १०,९६० मतं जास्त मिळाली.
राज्यात स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन (SIR) मुळे एकूण ९१ लाख मतं कमी झाली होती. म्हणजेच प्रत्येक जागेवर सरासरी ३० हजार मतदारांची नावं कापली गेली. एकूण २९३ जागांपैकी १७६ जागांवर विजयाचे अंतर ३० हजारांपेक्षा कमी, तर ११७ जागांवर ३० हजारांपेक्षा जास्त राहिले.
यावर कोर्टाने स्पष्ट केलं होतं की, "निवडणूक निकालात तेव्हाच हस्तक्षेप केला जाईल, जेव्हा मोठ्या संख्येने मतदार बाहेर काढले गेले असतील आणि ती संख्या विजयाच्या अंतरावर परिणाम करत असेल. समजा विजयाचे अंतर २ टक्के आहे आणि १५ टक्के मतदार मतदान करू शकले नाहीत, तर आपल्याला यावर विचार करावा लागेल. ही चिंतेची बाब असू शकते. बाहेर काढलेल्या मतदारांचा प्रश्न आमच्या विचाराधीन नाही, असे समजू नका, असंही न्यायमूर्ती बाग यांनी सांगितलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.