धावत्या कारमध्ये महिला वकिलावर अत्याचार
पुणे : खरा पंचनामा
शहरातील मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरात एका महिला वकिलावर धावत्या कारमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका हॉटेलमध्ये आयोजित पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी आरोपी देखील तेथे उपस्थित होता. दोघांची यापूर्वी कोणतीही ओळख नसतानाही आरोपीने महिलेशी ओळख वाढवली. पार्टी संपल्यानंतर "मी तुला घरी सोडतो" असे सांगत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कारमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, अर्ध्या रस्त्यात आरोपीने कारमध्येच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. धावत्या वाहनात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित महिला वकील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.