Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य मानांकित टेनिस स्पर्धेत भार्गवी भोसले व रियान पाटील अव्वल

राज्य मानांकित टेनिस स्पर्धेत भार्गवी भोसले व रियान पाटील अव्वल

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आणि श्रेया पै टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य मानांकित १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत सांगलीच्या भार्गवी भोसले आणि पुण्याच्या रियान पाटील यांनी विजेतेपद पटकावत आपला ठसा उमटविला. ही स्पर्धा आमराई ऑफिसर्स क्लब, सांगली येथे ९ व १० मे रोजी उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन दत्ता पै यांच्या हस्ते झाले. राज्यभरातून मुला-मुलींच्या गटात एकूण ३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

मुलांच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या रियान पाटीलने पुण्याच्याच रेयांश हूडलानीचा ४-१, ४-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.

मुलींच्या गटात सांगलीच्या भार्गवी भोसलेने शानदार पुनरागमन करत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर भार्गवीने सोलापूरच्या ज्योतिष्का अरेकांतीविरुद्ध आक्रमक खेळ करत पुढील दोन्ही सेट ४-०, ४-० असे जिंकले. तिने सामना १-४, ४-०, ४-० असा जिंकून प्रेक्षकांची दाद मिळवली.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पोलाइट स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष प्रीतेश कोठारी, राष्ट्रीय प्रशिक्षक रवींद्र कदम, सोनू तोडू, स्पर्धा निरीक्षक मेहुल केनिया, डॉ. संदीप पाटील, सागर पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजकांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.