Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स?

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स?

नाशिक : खरा पंचनामा 

भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला, इतकेच नाही तर अनेकांच्या जमिनीही हडपल्या. या प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर काही नेत्यांवर मोठे आरोप झाले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून काहींचे थेट खरातशी व्यवहारिक संबंध समोर आल्याचं सांगितलं जात होतं. या दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची सातत्याने मागणी होत होती. दोन दिवसांआधी त्यांची तब्बल साडेपाच तास एसआयटी चौकशी सुरु होती. यानंतर आता सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स जारी झाल्याचं सूत्रांनी कळवलं आहे. इतकेच नाही तर पदाचा गैरवापर करुन आर्थिक व्यवहार झाले का, याचा सखोल तपास होणार आहे. सूत्रांच्याच माहितीनुसार, शिवनिका संस्थेत सहभाग का आणि कसा झाला याबाबतही चौकशी होणार असं समोर आलं आहे. एकूणच यामुळे रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.