Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नकाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

मुंबई : खरा पंचनामा 

सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये समस्या निर्माण झाली आहे.

सलग तीन वेळा वाहतूक थांबल्याने वाहनांच्या सकाळपासूनच प्रचंड रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत दरम्यान आज मिसिंग लिंक उद्घाटन होतात वाहने सोडणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होऊ शकते मात्र मिसिंग लिंकच्या कार्यक्रमासाठी पोहचेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिसिंग लिंकच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिली. ते म्हणाले की, आम्ही येताना विमानातून पाहिले की खूप वाहतूक कोंडी झाली आहे. तुम्ही टोलनाक्यावर टोल टॅक्स न घेण्याची सूचना द्या आणि आपले पोलिसही तिथे उभे करा. यावर महिला पोलिस अधिकारी म्हणाल्या की आपण मिसिंग लिंक थोड्या वेळात सुरु करणारच आहोत, पण यावर शिंदे म्हणाले की, कार्यक्रम झाला की मिसिंग लिंकवरुन वाहने सोडूच पण तुम्ही आधी त्यांना टोल न घेण्याच्या सूचना द्या.

मोठ्या विकेंडमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. लोणावळ्याजवळील अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांचा पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक आहे.

या कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. मुंबईहून पुण्याकडे जात असताना सुप्रिया सुळे यांची गाडी खंडाळा घाट परिसरात तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकली. सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, "It's been two hours" (दोन तास झाले). त्या गाडीत बसून घाटात लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा दाखवत आहेत. शिवाय, शेजारील वाहनांतील चालकांशी गप्पा मारताना आणि परिस्थितीची चर्चा करताना दिसत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.