Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय१२ आमदारांचा परदेश दौरा तातडीने रद्द

मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय
१२ आमदारांचा परदेश दौरा तातडीने रद्द

मुंबई : खरा पंचनामा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्याचे तंसच परदेशात फिरायला जाण्याचे एका वर्षासाठी पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. पीएम मोदी यांच्या आवाहनानंतर राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. विधीमंडळाचे १२ आमदार जपान दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांचा प्रस्तावित जपान दौरा पीएम मोदी यांच्या आवाहनानंतर रद्द करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रातील आमदारांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. विधीमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जपानच्या दोन राज्यांतील गव्हर्नरकडून भेटीचे निमंत्रण आले होते. या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातील १२ आमदारांचे शिष्टमंडळ जाणार होते. पण पीएम मोदींच्या आवाहनानंतर त्यांनी दौरा रद्द केला.

दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका फक्त भारतालाच नाही तर जगभरातील अनेक देशांना बसत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी भारतामध्ये पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगावर असलेले हे संकट लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन सभांमध्ये भारतातील जनतेला इंधनाची बचत करा असे आवाहन केले. त्याचसोबत वर्षभर सोनं खरेदी करू नका असे सांगितले.

पीएम मोदी यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेल खूप महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. परदेशात लग्न करणे, परदेशात प्रवास करणे आणि परदेशात सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी जाणं ही संस्कृती मध्यमवर्गामध्ये प्रचलित होत आहे. पण आपण ठरवले पाहिजे की या संकटाच्या काळात आपण परदेश प्रवास किमान एक वर्षासाठी पुढे ढकलला पाहिजे. त्याचसोबत वर्षभर सोनं खरेदी करू नये. आपण वर्कफ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्स आणि व्हर्चुअल मीटिंग्जला पुन्हा प्राधान्य दिले पाहिजे.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.