'तुमचा बाप जिवंत आहे, कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे, तोपर्यंत काटा...'
बीड : खरा पंचनामा
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या ताब्यात लागला नाही. पण, आंधळेच्या गावामध्ये गावकऱ्यांना जीव मारण्याच्या धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. "कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, तुमचा बाप जिवंत आहे' अशा शब्दांत गावकऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. गावातील काही लोक हे अजूनही कृष्णा आंधळेच्या संपर्कात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या गावातील लोकांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि कृष्णा आंधळे गँग विरोधात तक्रार केली आहे. "कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत आम्ही तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, तुमचा बाप बाहेर जिवंत आहे" अशी धमकी देऊन गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ही गँग करत आहे. कृष्णा आंधळे च्या संपर्कात गावातील काही लोक आहेत, असा दावा कृष्णा आंधळेच्या गावातील लोकांनी केला आहे.
बीडच्या धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील लोकांना विनाकारण मारहाण करून, दहशत निर्माण करणे आणि गावातील शांतताभंग करणे यासह या गँग कडून घातपाताच्या घटनेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तात्काळ या गँगचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या गँगमधील आरोपी नामे नितीन राजेभाऊ मैंद, जयराम राजेभाऊ मैंद, राजेभाऊ धोंडिबा मैंद, या टोळीकडून गावात नेहमी बाहेरील गुंड व्यक्ती (कृष्णा आंधळे गँग) मधील गुंड व्यक्ती आणि इतरांकडून धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील लोकांना धमकावलं जात आहे, गावात दहशत निर्माण केली जात आहे, याबद्दल निवेदन पोलिस अधीक्षक यांना दिलं आहे. या निवेदनामध्ये गावातील अनेक दहशतीच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी घडलेले आपबीती आणि गँगची गुंडगिरी दहशत याचा पाढा वाचला.
"कृष्णा आंधळे हा गावातील लोकांच्या संपर्कात आहे, त्यामुळे ज्या लोकांची नावं निवेदनात दिली आहेत, त्यांचे कॉल रेकॉर्डिंग आणि सीडीआर काढला तर कृष्णा आंधळेचा पत्ता लागेल, असा दावाही गावातील नागरिकांनी केला आहे. गावात खूप मोठे दहशत असून खोट्या केसेस करणे, गावातील चोरा माऱ्या, खोटे गुन्हे दाखल करणे, यासारखे प्रकार होत असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.