Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचे फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचे फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

दिल्ली : खरा पंचनामा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वे दौऱ्यावर गेले होते. तिथे नॉर्वेचे पंतप्रधान जोनस गहर स्टोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेत पत्रकारांना मोदींना एकही प्रश्न विचारता आला नाही. पंतप्रधान त्या परिषदेतून निघत असतानाच नॉर्वेची पत्रकार हॅले लिंग हिने एक व्हिडीओ काढत पंतप्रधान मोदी तुम्ही पत्रकारांच्या एकही प्रश्नाचे का उत्तर देत नाही? असा प्रश्न केला होता. त्यावरही पंतप्रधानांनी काहीच उत्तर दिले नाही.

या प्रकारानंतर हॅले हिने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान आता हॅले हिने X वर एक पोस्ट शेअर करत तिचे फेसबुक व इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचे सांगितले आहे. "जर तुम्ही माझ्याशी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असाल, तर सध्या ते शक्य नाहीये. कारण माझी दोन्ही अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आली आहेत. मला जास्तीत जास्त हिंदुस्थानींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, पण आता माझ्या उत्तरांना उशीर होईल. मला आशा आहे मेटा माझे अकाऊंट्स रिस्टोर करेल", असे हॅले लिंग हिने पोस्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधानांच्या दौऱयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यात लिंग यांनी परराष्ट्र सचिव सिबी जॉर्ज यांना विचारले की, आम्ही हिंदुस्थानवर विश्वास का ठेवावा? हिंदुस्थानात जे होत आहे ते थांबवणार का? पंतप्रधान कधी तरी हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांच्या कठीण प्रश्नांची उत्तरे देणार का, अशी प्रश्नांची सरबत्ती लिंग यांनी केली. त्यावर जॉर्ज संतापले. तुम्ही प्रश्न विचारा. उत्तर कसे द्यायचे हा माझा हक्क आहे, असे जॉर्ज यांनी लिंग यांना सुनावले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.