Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मला 15000 लोकांना मारायचं होतं, गर्दीत गोळ्या वाटणाऱ्या फयाजने दिली कबुली

मला 15000 लोकांना मारायचं होतं, गर्दीत गोळ्या वाटणाऱ्या फयाजने दिली कबुली

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना 'पेन किलर' गोळ्या असल्याचे सांगून चक्क उंदीर मारण्याचे औषध वाटण्यात आल्याची घटना घडली आहे.

या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे काही तरुणांची प्रकृती बिघडली असून, एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी मोठा कट उधळला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात आरोपीने धक्कादायक खुलासा केला असून मला कमीत कमी 15 हजार लोकांना मारायचं होत, अशी खळबळजनक कबुली दिली आहे.

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोळ्यांचे वाटप करणाऱ्या मुख्य आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून 14 हजार विषारी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचं नाव फय्याज निसार हुसेन प्रेमजी असून त्यानं 30 हजार गोळ्यांची ऑर्डर दिल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. फैयाज प्रेमजी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. भायखळा परिसरात मोहरमची मिरवणूक सुरू होती. त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली, असता त्याने सांगितलं की तो वेदना शामक कॅप्सूल वाटप करतोय. परंतु तिथे कुठली परवानगी ना घेता तो अशा प्रकारची कॅप्सूल वाटप करत होता, म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून सगळा साठा जप्त केला.

दरम्यान पोलीस चौकशीत फयाजने धक्कादायक खुलासे केले आहे. फयाज चौकशीत म्हणाला की, मला कमीत कमी 15 हजार लोकांना मारायचं होत. मी मिरवणुकीत काही गोळ्या चॉकलेट म्हणून उधळल्या, काही गोळ्या पेन किलर म्हणून दिल्या आहेत.

फयाजने 50 किलो झिंक फॉस्फाईडची ऑर्डर दिली होती. झिंक फॉस्फाईडचा वापर हा उंदीर मारण्याच्या गोळ्यांमध्ये केला जातो. काही दिवसांपासून तो राहत्या घरी एक एक ग्रॅम विष टाकून कॅप्सूल तयार करत होता. मोहरमला टार्गेट करण्याचा त्याचा हेतू होता. त्याने 2025 मध्ये इराण आणि इराकचा प्रवास केला होता. त्याच्याकडून 14900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. तर 30000 कॅप्सूल तयार करण्याचे त्याचे लक्ष्य होते. त्या कॅप्सूलचे वितरण झाले नाही. पोलिसांमुळे मोठा कट उधळला. आतापर्यंत 11 ते 12 लोकांनी कॅप्सूल खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला असून मात्र उर्वरित लोकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर आसल्याची असून हा आकडा वाढण्याची भीती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.