Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॉकरोच पार्टीचे येत्या 20 जूनला. दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन !

कॉकरोच पार्टीचे येत्या 20 जूनला. दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन !

पुणे : खरा पंचनामा 

देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सगळीकडे चर्चा आहे. नीट परीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलू धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आता कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

अभिजित दिपके यांनी आज (10 जून) पत्रकार परिषद घेतली. यावळी त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. आता लवकरच आम्ही या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देऊ, असे अभिजित दिपके यांनी सांगितले.

तसेच, कॉकरोच जनता पार्टी अस्तित्त्वात आली तेव्हा हे फक्त सोशल मीडियावरच असेल. दिल्लीत जमिनीवर आंदोलन करण्यासाठी कोणीही येणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु 6 जून रोजी पूर्ण जंतर-मंतरचे मैदान आंदोलकांनी भरलेले होते, असेही ते म्हणाले.

अभिजित दिपके यांनी देशभरातील पालकांना आवाहन केले आहे. "तुमची मुलं सरकारला जाब विचारत असतील, राजकारणावर बोलत असतील तर तुम्हाला भीती वाटत असेल. माझ्या आईलाही भीती वाटत आहे. माझी आई तर तू परत येऊच नको, असे सांगत होती. हे तुला अटक करतील, तुझ्यावर हल्ला होईल, असे ती सागंत होती. परंतु यावे लागेल. कोणालातरी बोलावंच लागेल, असे मी तिला सांगितले. मी सगळ्या आई-वडिलांना सांगेन की तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबवू नका," असे दीपके म्हणाले.

“मी एकटा बोलत असेल तर ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. परंतु लाखो, करोडो मुलं बोलतील तर कोणाचा आवाज दाबण्याची त्यांची हिंमत होणार नाही. तुरुंगात कोणाला जायचंच असेल तर मी जाईल. मी तुमच्या मुलांना तुरुंगात जाऊ देणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतो. परंतु तुमच्या मुलांना बोलण्यापासून रोखू नका," असे आवाहन अभिजित दीपके यांनी केले. तसेच पुण्यातील आंदोलन हे जंतर-मंतरपेक्षा मोठे असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.