राम मंदिर ट्रस्टच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 जण गजाआड
अयोध्या : खरा पंचनामा
राम मंदिर कथित देणगी चोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे आणि उत्तरप्रदेश सरकारच्या माहिती संचालकांच्या पुष्टीनंतर ही मोठी घडामोड समोर आली. या कथित देणगी चोरी प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अखेर आपल्या पदचा राजीनामा दिला आहे. राम मंदिरातील कथित देणगी चोरीचा मोठा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी मोठा दबाव होता. या प्रकरणी ते सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर होते. चंपत राय यांच्यासोबतच ट्रस्टचे आणखी एक महत्त्वाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या माहिती संचालकांनी या दोन्ही राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत होते. गुरुवारी सकाळपासूनच चंपत राय यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या चोरीच्या प्रकरणात पोलीस आणि तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली असून, काल रात्रीच तब्बल आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राम मंदिराच्या सुरक्षेतील आणि व्यवस्थापनातील हा मोठा दोष समोर आल्यानंतर ट्रस्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, ज्यामुळे अखेर या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावे लागले आहे.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराशी संबंधित कथित देणगी अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ही मोठी घडामोड उघडकीस आली. उत्तरप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्राथमिक अहवालाच्या आधारे पहिला एफआयआर दाखल झाला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असतानाच हे राजीनामे आले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शुक्रवारी या प्रकरणी एक निवेदन जारी केले. देवरिया येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, जो कोणी लोकांच्या श्रद्धेशी छेडछाड करेल, त्याच्या विरोधात ते शून्य-सहिष्णुता धोरणानुसार कारवाई करतील. त्यांनी पुढे म्हटलं, "अयोध्या हे आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अयोध्येवर कलंक लावू नका. श्रीरामाच्या प्रतिष्ठेचा आदर करायला शिका. मी म्हटले होते की, एसआयटीच्या अहवालावर कारवाई केली जाईल. एसआयटीचा अहवाल आला आहे. कारवाई सुरू झाली आहे."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.