Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर दीड किलो सोन्याचा कळस

श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर दीड किलो सोन्याचा कळस 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

भक्ताने अर्पण केलेला दीड किलो वजनाचा सोन्याचा कळस मंदिराच्या शिखरावर बसविण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. गुरुवारी रात्री अकरा वाजता कळस बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

क्रेनच्या मदतीने दोनशे किलोचे तांब्याचे आवरण व इतर साहित्य शिखरापर्यंत पोहोचविण्यात आले. यानंतर मुख्य कामाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत कळस बसविण्याचे काम पूर्ण होईल, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते.

मंदिराचे शिखर सहा फूट उंच असून, गोलाकार डेराही आकर्षक आहे. यामुळे त्याला कोणतीही बाधा न आणता कळस बसविण्याचे आव्हान होते. मंगलोर येथील कारागिरांनी कळसाचे काम पूर्ण करून दीड किलो सोन्यात साकारला. गुरुवारी सायंकाळी हा कळस मंदिरात दाखल झाला. रात्री तो कळस व डेऱ्या भोवतीचे आवरण शिखरावर चढविण्याचे काम सुरू करण्यात आले. सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह वीस कर्मचाऱ्यांचे पथक यासाठी कार्यरत झाले.

पावसाचे पाणी झिरपणार नाही यासाठी कळसास भोवतीच्या गोलाकार डेऱ्याला तांब्याचे २०० किलो वजनाचे आवरण बनविण्यात आले आहे. कासव मंडपावरील कळसावर पहिले आवरण बसविण्याचे काम रात्री एकपर्यंत सुरू होते. यानंतर मंदिराच्या मुख्य शिखरावरील कळसाचे काम सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता सचिव शिवराज नाईकवाडे यांनी वर्तवली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.