Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चक्क जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर करायचे गर्भलिंग निदानअखेर डॉक्टर संगिता गायकवाडला पोलिसांनी पकडलं

चक्क जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर करायचे गर्भलिंग निदान
अखेर डॉक्टर संगिता गायकवाडला पोलिसांनी पकडलं

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी केडगावमधील 'पार्थ हॉस्पिटल'च्या महिला डॉक्टरला अटक केली आहे. पुण्यातील दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफीद्वारे घरात बेकायदेशीर तपासणी केली जात होती. ३५ ते ५० हजार रुपयांत गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचं समोर आलं होतं.

या प्रकरणीत तोतया डॉक्टर अण्णासाहेब गिरी हा सोनोग्राफीमध्ये गर्भात मुलगी असल्याचे समजताच, संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी केडगाव चौफुला मधील पार्थ हॉस्पिटल'मध्ये पाठवत होता. केडगाव चौफुला मधील पार्थ हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला जात होता. अखेरीस पोलिसांनी 'पार्थ हॉस्पिटल'च्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरात गुप्तपणे गर्भलिंग तपासणी करायचा. यासाठी ३५ ते ५० हजार रुपये घेतले जात होते. या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दलाल आणि इतर डॉक्टरांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होती.

तसंच हे संघटित रॅकेट असल्याचा संशय होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर आता 'पार्थ हॉस्पिटल'च्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाडला अटक केली आहे. तसंच, या प्रकरणी अण्णासाहेब गिरीचा सहकारी नरेंद्र साहेबराव ठाकरे, लोहगाव येथील डॉ. अतुल अंकुश जाधवला सुद्धा अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.