कोल्हापूर पोलीस दलात मोठे फेरबदल!
अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पूजा फडके
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज शुक्रवारी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे व नवीन नेमणुकीचे आदेश जारी केले आहेत. या नवीन आदेशानुसार, पदोन्नती आणि बदल्यांमुळे रिक्त झालेल्या जागांवर तात्काळ प्रभावाने पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
प्रमुख बदल्या आणि नवीन पदस्थापना :
पोलीस अधिकाऱ्यांचे नाव, सध्याची नेमणूक, बदलीने नवीन पदस्थापना :
शिवाजी मारुती गायकवाड : शिवाजीनगर पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा, इचलकरंजी
शरद शंकरराव मेमाणे : हातकणंगले पोलीस ठाणे ते शिवाजीनगर पोलीस ठाणे
किशोर सदाशिव शिंदे : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते गांधीनगर पोलीस ठाणे
सचिन हिंदूराव सुर्यवंशी : राधानगरी पोलीस ठाणे ते हातकणंगले पोलीस ठाणे
सतिश भाऊसाहेब होडगर : राजारामपूरी पोलीस ठाणे ते गडहिंग्लज पोलीस ठाणे
विकास तुळशीराम जाधव : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते राजारामपूरी पोलीस ठाणे
अजित पांडुरंग सिद : पोलीस कल्याण शाखा ते राधानगरी पोलीस ठाणे
सपोनि रणजित हणमंतराव पाटील : राजारामपूरी पोलीस ठाणे ते गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे
तात्पुरत्या स्वरूपातून नियमित नेमणूक मिळालेले अधिकारी व ठिकाण :
रविंद्र भानुदास कळमकर : करवीर पोलीस ठाणे
नामदेव गणपतराव शिंदे : पन्हाळा पोलीस ठाणे
विजय बाबा घेरडे : वडगाव पोलीस ठाणे
तात्काळ हजर होण्याचे आदेश : संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हा आदेश प्राप्त होताच तात्काळ प्रभावाने नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना आजच कार्यमुक्त करून तसा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.