शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत हटणार नाही : अभिजित दिपके आक्रमक
दिल्ली : खरा पंचनामा
नीट परिक्षेतील पेपरफुटी प्रकरणी जोपर्यंत केंदीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ते जंतर-मंतरवरून हटणार नाहीत, अशी ठाम भूमिका सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी घेतली.
या परीक्षांमधील कथित अनियमितता, वारंवार होणारी प्रश्नपत्रिका फुटण्याची प्रकरणे आणि सरकारकडून उत्तरदायित्वाची मागणी या मुद्द्यांवर कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या दुसऱ्या आंदोलनादरम्यान तेथे जमलेल्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि समर्थकांना ते संबोधित करत होते.
नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे जंतर-मंतरवर रविवारी दुस-या दिवशीही आंदोलन सुरू आहे. आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रात्रभर जंतर-मंतरवर बसून होते.
अभिजीत दीपके म्हणाले, प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू राहील. रविवार सकाळी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी परीक्षेच्या नंतर आंदोलनात यावे. मी प्रशासनाला विनंती करतो... कारण देशभरातील तरुण येथे आले आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना येथेच बसायचे आहे.
दिल्ली पोलिसांना आमची परवानगी वाढवून देण्याची विनंती करतो. हे आंदोलन शांततापूर्ण राहिले आहे; आम्ही केवळ सामान्य विद्यार्थी आहोत ज्यांना येथे बसायचे आहे. यापूर्वी शनिवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक देखील आंदोलनात सहभागी झाले. ते म्हणाले की, जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर ते २७ जूनपासून उपोषण सुरू करतील.
कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर झाली. १५ मे रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा फळक कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात. या टिप्पणीच्या दुस-या दिवशी, १६ मे रोजी, अमेरिकेत राहणा-या अभिजीत दीपके यांनी सीजेपीची सुरुवात केली आणि सोशल मीडियावर पक्षाची खाती तयार केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.