Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा 
राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : खरा पंचनामा 

'मनसे' प्रमुख राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. पण, वाढदिवशी राज ठाकरे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मुंबईत हजर नसतील, या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी त्यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शहरांमध्ये शुभेच्छांची होर्डिंग्स न लावता राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. याबाबतची सविस्तर पोस्ट राज यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शुभचिंतकांची भेट होऊ शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. पण, 'यावेळी शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा', असे आवाहन राज यांनी केले आहे. 'वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा', अशी विनंती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

'यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा. फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात. बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या. झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील, बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत. अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील', असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.