महाराष्ट्रात जुलैमध्ये अतिवृष्टी होणार, राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पुणे : खरा पंचनामा
राज्यातील शेतकरी जून महिन्यात पेरणी करायला सुरूवात करतो. महाराष्ट्रातील खरीप हंगामासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण यंदा जून महिन्यात पाऊसचं झाला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पेरणी नेमकी करायची कधी याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. त्यात भारतीय हवामान विभागाने दिलेल्या 'एल निनो'च्या अंदाजामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. अशामध्ये हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात 21 जूननंतर मान्सूनचा वेग वाढणार असा अंदाज पंजाबरावांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला होता. त्यांनुसार कोकणात रेंगाळलेला मान्सून हळूहळू पुढे सरकू लागला होता. आता मान्सून पुणे जिल्ह्यात दाखल झाला असून येत्या 48 तासांमध्ये मुंबईसह संपूर्ण राज्यात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे पंजाबरावांच्या नव्या अंदाजाकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.
23 जून 2026 रोजी पंजाबराव डख यांनी ताजा अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 23 जून ते 30 जून ठिकठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या लागणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जूनमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण जुलैमध्ये जूनपैक्षा पाऊस जास्त होणार आहे.
हा अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यासह मुंबई, पुणे नाशिकमध्ये 22 जूनला पाऊस सुरू झाला. मंगळवारी, 23 जूनपासून हा पाऊस वाढत जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसचं 5 जुलै पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असाहा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
एल निनोमुळे राज्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण होण्याची भीती असताना राज्यात "दुष्काळ वगैरे काही पडणार नाही" असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीही त्यांनी दिली आहे. 2 जुलै ते 20 जुलैदरम्यान महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्हा, मुंबई महानगर प्रदेश, कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यावेळी जायकवाडी धरण, कोयना धरणांमधून पाणीसाठा वाढणार आहे याची दखल शेतकऱ्यांनी घ्यावी.
विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 23 जून रोजी चांगला पाऊस होईल. विदर्भात येत्या दोन तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे या 11 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
मराठवाड्यात परभणी, बीड, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार असून परेणीला सुरूवात होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली असून येत्या 10 दिवसांमध्ये सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही 5 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे.
दरम्यान, जूनमध्ये कमी पाऊस झाल्यानंतर जुलैमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. ऑगस्टमध्ये हा जोर पुन्हा मंदावेल असा अंदाजही पंजाबराव डख यांनी वर्तवला पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार असा त्यांचा अंदाज आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.