कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, आंदोलनापूर्वी ३ प्रवक्त्यांची नियुक्ती
दिल्ली : खरा पंचनामा
कॉकरोच जनता पार्टीने मोठा निर्णय घेतला आहे. या पक्षाने आपल्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून ३ प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. त्यांनी या तिघांची नावं देखील जाहीर केली आहेत. यामध्ये एक पत्रकार, एक फिल्ममेकर आणि एक पूर्व मॅनेजमेंट कंसल्टेंट यांचा समावेश आहे.
कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी आणि सीबीएसई प्रणालीतील कथित त्रुटींवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ जून रोजी दिल्लीमध्ये शांततापूर्व पद्धतीने हे आंदोलन होणार आहे. या संघटनेने शिक्षण आणि तरुणांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणारे व्यासपीठ म्हणून सोशल मीडियावर विद्यार्थी आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
या आंदोलनापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीने मोठा निर्णय घेत ३ प्रवक्त्यांची नियुक्ती केली. या आंदोलनादरम्यान जनतेसमोर आणि माध्यमांसमोर पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी या तिघांवर असणार आहे. पत्रकार सौरभ दास यांना मुख्य प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्मात्या विजेता दहिया आणि आयआयटी कानपूर आणि जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी मॅकिन्सेचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका हे देखील सौरभ दास यांच्यासोबत प्रवक्ते म्हणून काम करतील.
कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहले की, 'सीजेपी भारताच्या राजकीय चर्चेची दिशा बदलण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या प्रयत्नांचे नेतृत्व नेत्यांची नवी पिढी करेल. सौरभ दास यांना कायदेशीर, न्यायालयीन आणि सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पत्रकारितेचा अनुभव आहे. पक्षाने असाही दावा केला आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये इंडिया गेट येथे झालेल्या प्रदूषणविरोधी आंदोलनात सौरभ दास यांना प्रमुख भूमिका बजावली होती.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी असलेले आशुतोष रांका यांनी यापूर्वी लंडनमधील जागतिक सल्लागार कंपनी मॅकिन्से अँड कंपनीमध्ये काम केले होते. रांका गेल्या वर्षी भारतात परतले आणि तेव्हापासून जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि युवा प्रश्नांवर विविध सार्वजनिक मोहिमांमध्ये ते सहभागी झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.