Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी

पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! 
कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी

मुंबई : खरा पंचनामा 

पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क आल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरात विविध शहरांमध्ये छापे घालत तब्बल ११२ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश आहे.

'एटीएस'ने या सर्वांची चौकशी सुरू केली आहे. या व्यक्ती प्रामुख्याने मुंबई, ठाणे, मीरा रोड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अहिल्यानगर, परभणी आदी जिल्ह्यांतील आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुण या टोळीशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजताच पथक दाखल झाले. या पथकाने गुरुवारी दहा तासांहून अधिकवेळ या तरुणांकडे चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे.

यापूर्वी म्हणजे २०२२ मध्ये दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून हुपरीतील तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. एनआयए पथकाने २०२३ मध्ये कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यात छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. पुन्हा आता शहजाद भट्टीच्या निमित्ताने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे नाव चर्चेत आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.