Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आभाळ फाटलं. अतिमुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना मोठं आवाहन

आभाळ फाटलं. अतिमुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना मोठं आवाहन

मुंबई : खरा पंचनामा 

आज भारतीय हवामान विभागाने मुंबईसह, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट जारी केला. 6 जुलैपर्यंत पावसाचा इशारा दिला. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही.

मुंबईमध्ये पावसाने हाहाकार केला. सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईकरांना प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शक्यतो घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आभाळ भरले असून पाऊस सुरू आहे. पुढील काही तासात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील जवळपास भागात पाऊस कोसळत आहे. जून महिना कोरडा गेला. पण सध्या जो पाऊस कोसळत आहे, तो पूर्ण भरपाई भरून काढत आहे. दोन दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले जातंय.

कल्याण-डोंबिवलीत ढगांची दाटी झाली असून काळे ढग झाली आहेत. पुन्हा सरींची शक्यता कायम आहे. काल दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी परिसरात ढगाळ वातावरण कायम आहे.

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट आजही आहे. रात्रभर मुसळधार पाऊस सुरूच होता. सतर्क राहून काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे. रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे. सकाळी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबई, ठाणे, सातारा, पालघर, पुणे घाटमाथा परिसरात भारतीय हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला. रत्नागिरी, नाशिक, रायगड, कोल्हापूर, वाशिम, यवतमाळ, गोदिंया, नाशिक घाटमाथा येथे भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.