Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंढरपुरात धार्मिक स्थळावर दगडफेक, शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

पंढरपुरात धार्मिक स्थळावर दगडफेक, शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात 

पंढरपूर : खरा पंचनामा 

शहरातील एका धार्मिक स्थळावर एका माथेफिरूने अज्ञात कारणावरून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

पंढरपूर शहरातील कराड रोडवरील एका धार्मिक स्थळावर एका व्यक्तीने तुफान दगडफेक करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर समाज बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते.

ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी प्रार्थना स्थळात मोठ-मोठे दगड पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरांमध्ये दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला असून सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.