Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विद्यार्थी अन् तरुणांसाठी सांगली पोलीस दल ॲक्शन मोडवर!सायबर गुन्हे आणि व्यसनमुक्तीबाबत २७ जुलैला भव्य जनजागृती कार्यक्रम

विद्यार्थी अन् तरुणांसाठी सांगली पोलीस दल ॲक्शन मोडवर!
सायबर गुन्हे आणि व्यसनमुक्तीबाबत २७ जुलैला भव्य जनजागृती कार्यक्रम

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे व्यसन, महिला आणि वाहतूक सुरक्षितता या गंभीर विषयांवर विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता संजयनगर येथील बिरनाळे पब्लिक स्कूल येथे भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
कार्यक्रमाचे स्वरूप आणि मुख्य उद्देश ऑनलाईन फ्रॉड, फिशींग, सायबर स्टॉकींग, बुलिंग यांसारख्या डिजिटल धोक्यांची माहिती देणे आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती घडवून आणणे हा आहे. सायबर सुरक्षेसोबतच महिला सुरक्षा आणि वाहतूक सुरक्षा या विषयांवरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सायबर कमांडो, सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, डॉ. चंद्रशेखर हळींगळे हे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सांगली पोलीस दलाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून थेट (Live) प्रक्षेपण केले जाणार आहे. हे प्रक्षेपण दिनांक २७ जुलै २०२६, सोमवार सकाळी १०:३० वाजता बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर, सांगली येथे होत आहे.

यासाठी अधिकृत YouTube Channel: sanglipolice5701

 थेट प्रक्षेपणाची Link: YouTube Live Link

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.