सलमाननंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचा आमिर खानला इशारा
मुंबई : खरा पंचनामा
बॉलिवूड अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गटाचे सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी कथितरित्या शेअर केलेली एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आली आहे.
त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमिर खानसारखे लोक आपल्या देशात लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही या माणसाला सहन करणार नाही आणि त्याला लवकरच त्याचे परिणाम भोगावे लागतील. हे सनातन धर्म आणि देशाच्या विरोधात आहे.
मात्र, मुंबई पोलिसांना अद्याप आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही तक्रार मिळालेली नाही. फेसबुक आणि एका व्हॉइस नोटद्वारे आलेल्या कथित धमकीबद्दल पोलिसांना माध्यमांकडून माहिती मिळाली आहे. त्याची ते पडताळणी करत आहेत. आमिर खानकडून तक्रार आल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
दरम्यान, काळवीट शिकार प्रकरणावरून लॉरेन्स बिश्नोई यांचा सलमान खानसोबत वाद सुरू आहे. दरम्यान, बिश्नोई टोळीकडून आमिर खानला पहिल्यांदाच धमकी देण्यात आली आहे.
ऑडिओ क्लिप्समध्ये म्हटले आहे, 'आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशवासियांना वचन देतो की, अशा लज्जास्पद कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कोणालाही आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू. स्टारडमच्या नावाखाली जे याचा प्रचार करतात, त्यांचा आम्ही गळा दाबू.'
तर काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनीही आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले होते. हा वाद वाढत असताना, आमिर खानने एका मुलाखतीत, 'माझ्या तीनही लग्नांमधील कोणत्याही पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारला नाही. आमचे लग्न विशेष विवाह कायद्यातील तरतुदीप्रमाणे झालेले आहे. तसेच माझी तिसरी पत्नी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न हिंदू मुलांशी झाले आहे. माझ्या मुलीनेही हिंदू मुलाशी लग्न केले,' असे सांगितले होते.
६१ वर्षांच्या आमिर खान आणि गौरी स्प्रंट यांनी ५ जुलै रोजी एका खासगी समारंभात नोंदणी पद्धतीने लग्न केले. या लग्नाला त्यांच्या कुटुंबाबरोबरच त्यांचे निवडक निमंत्रित उपस्थित होते. मात्र सध्या त्यांच्या लग्नावरून वाद सुरू झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.