Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महावीर स्टेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा 'संसद रत्न' पुरस्काराने सन्मान

महावीर स्टेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा 'संसद रत्न' पुरस्काराने सन्मान

सांगली : खरा पंचनामा 

कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्सच्या वतीने आयोजित युवा संसद स्पर्धेत महावीर स्टेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच सहभागात दैदिप्यमान यश मिळवले आहे. या स्पर्धेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित 'संसद रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वेदिका पाटील, दर्पित ताटे, आयुष पाटील, स्वरा पाटील आणि स्वस्तिका व वाडकर या विद्यार्थ्यांनी वर्गातून थेट संसदेपर्यंतचा प्रवास करताना उत्कृष्ट वादविवाद केला, नेतृत्व दाखवले आणि विजय मिळवला. तरुण मनातील मोठ्या कल्पनांना आता व्यासपीठ मिळाले.

विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या  श्रीमती अल्का भांडवले आणि जयकुमार  चव्हाण सर यांच्या  या यशात मोठे योगदान आहे. या यशाबद्दल महावीर स्टेट अकॅडमीच्या वतीने  कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स व सहोदयाचे अध्यक्ष जी. बी. पाटील यांचे आभार मानले.

या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, संस्थेचे संस्थापक डी. डी. चौगुले, अध्यक्ष रावसाहेब पाटील व संस्थेचे सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.