Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

कोळसा घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआय विशेष न्यायालयाने दिलेला आदेश रद्द केला आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजावण्यात आले होते ते रद्द करण्यात आले.

मात्र सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट नाकारणं आणि दखल घेण्याचं औचित्य कनिष्ठ न्यायालयाकडे नव्हते असंही सुप्रीम कोर्टानं नमूद केलं. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती वी मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. मनमोहन सिंग यांच्या वतीने वकिलांनी केलेलं अपील स्वीकारण्यात आलं. सीबीआयचा क्लोजर रिपोर्टरही स्वीकारला असून त्यात मनमोहन सिंग यांना क्लीन चिट दिली.

मनमोहन सिंग यांच्या निधनाला दीड वर्षे झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलीय. मनमोहन सिंग यांच्यावतीने प्रतिनिधीत्व करणारे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटलं होतं की, मनमोहन सिंग यांच्याविरोधात न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती रद्द करण्याच्या आदेशासह ही याचिका निकाली काढता येऊ शकते.

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बजावलेल्या समन्सला १ एप्रिल २०२५ रोजी स्थगिती दिली होती. तेव्हाही कपिल सिब्बल यांनी कोळसा घोटाळा प्रकरणात मनमोहन सिंग यांनी कोणतीही बेकायदेशीर कृती केली नव्हती असं कोर्टात सांगितलं होतं.

सीबीआयने कोळसा घोटाळा प्रकरणी दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतरही विशेष न्यायालयाकडून मनमोहन सिंग यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने मनमोहन सिंग यांच्याविरोधात कार्यवाहीला स्थगिती दिली होती. आता बुधवारी मनमोहन सिंग यांच्यावतीने दाखल याचिका स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.