Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धणकर यांचा मृतदेह मुख्यालयात आढळला

त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धणकर यांचा मृतदेह मुख्यालयात आढळला

अगरतळा : खरा पंचनामा 

त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धणकर (१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी) यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक अहवालानुसार, वरिष्ठ आयपीएस अधिकारी धणकर यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयातच ही घटना घडली. गोळीचा आवाज ऐकून सहकाऱ्यांनी धाव घेतली असता धणकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू करण्यात आला आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अनुराग धणकर हे पोलीस सेवेतील एक अत्यंत अनुभवी आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. सीबीआयमध्ये कार्यरत असताना त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नीरव मोदी प्रकरणातील महत्त्वाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. १९८४ मधील शीखविरोधी दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही त्यांनी केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.