Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीजेपी अन् सरकारमधील 'हायव्होल्टेज' बैठक संपली, दोन मागण्यांबाबत सकारात्मकप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मोठी अपडेट

सीजेपी अन् सरकारमधील 'हायव्होल्टेज' बैठक संपली, दोन मागण्यांबाबत सकारात्मक
प्रधानांच्या राजीनाम्याबाबत मोठी अपडेट

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

दिल्लीसह देशभरात पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस विद्यार्थी, तरुणांचा प्रतिसाद वाढतो आहे. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.

याचदरम्यान, केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची 1 तास बैठक बोलावण्यात आली होती. व्ही. हाऊसमध्ये तासाभरानंतर ही बैठक पार झाली. या बैठकीत काय चर्चा होते, आंदोलन मागे घेणार का, या बैठकीतून आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

सीजेपी आणि केंद्र सरकारसोबत शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सीजेपीकडून सौरव दास आणि आशुतोष रांका उपस्थित होते. तर सरकारकडून जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत सुमारे एक तासभर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतील सरकारसोबत काय चर्चा झाली याची माहिती सीजेपीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांसमोर दिली.

ते म्हणाले, आम्ही सरकारचे प्रतिनिधी जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासमोर तीन मुख्य मागण्या मांडल्या. यात जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठी एक कोटींची नुकसान भरपाई, तसेच आंदोलनादरम्यान तरुण आणि तरुणींवर दाखल झालेले 11 एफआयर रद्द करण्याची मागण्यांचा समावेश होता. सरकारही या दोन दोन मागण्यांबाबत सकारात्मक आहे.

तर सीजेपीच्या प्रवक्त्यांनी मोदी सरकारसोबतच्या बैठकीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. यानंतर सरकारकडून प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.