"पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे... "
पुणे : खरा पंचनामा
देशभर प्रचंड वादळ उठवणाऱ्या नीट युजी (NEET-UG) 2026 पेपरफुटी प्रकरणाने राज्यासह देशाचं राजकारण ढवळून निघालं असतानायासंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अशातच देश भरत पेपर फुटीचे सत्र सुरूच असताना आता आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
नीट पेपर लीक झाल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली, त्या फेरपरीक्षेचा पेपर सुद्धा तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा अत्यंत गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाहोता. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कथित गैरप्रकार समोर आणला आहे. यासंदर्भात पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली कथित प्रेसनोट ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.
'पुरावेच लागतात ना? अंधभक्तांनो घ्या आता पुरावे..! पेपर फोडायचा, प्रवेश मिळवायचा आणि तीन चार वर्षात डिग्री, एवढी उठाठेव कशाला? महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते. उच्च शिक्षणमंत्री आता तरी झोपेतून उठा...! फडणवीस साहेब मानले राव तुमच्या सरकारच्या कारभाराला.!' अशा आशयाची पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे.
'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कर्मचारी श्री. रमेश दामोदर मुखेकर (वित्त व लेखा विभाग) यांनी साहिल महेश कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बी. कॉम. या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून सदर विद्यार्थ्याकडून रू.७०,०००/- (रूपये सत्तर हजार फक्त) गुगल पेद्वारे स्वीकारून व्हॉट्सअॅपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रांसारख्या भासणाऱ्या इमेजेस दिल्या, अशा आशयाची तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली.
या संदर्भात नमूद करण्यात येते की, सदर कर्मचारी हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही तसेच त्याने व्हॉट्सअॅपवर तयार करून दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नाहीत, असे निदर्शनास आले. तसेच श्री. मुखेकर यांनी पैसे स्वीकारून सदर गैरकृत्यात सहभाग घेतल्याचे दिसून येते.
सदर विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन श्री. मुखेकर यांना तात्काळ प्रभावाने विद्यापीठ सेवेतून निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेता, सखोल तपासाच्या दृष्टीने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे डॉ. राजेंद्र तलवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. पोलीस तपासात ज्यांचा या गैरकृत्यात सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सदरचा गैरप्रकार श्री. मुखेकर यांनी परीक्षा विभागाशी संबंधित नसतांना तसेच परीक्षा विभागाच्या व्यवस्थेबाबतचे त्यांचे ज्ञान वापरून केलेला असल्याचे निदर्शनास आलेले असून यात व्यवस्थागत इतर कोणाचा सहभाग आहे का, ही बाब पोलीस तपासात स्पष्ट होईल. विद्यापीठाकडून जारी करण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणपत्रिका व पदवीप्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षामानकांचा समावेश असल्यामुळे या संदर्भातील अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.
विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासहीनिशी दिनांक 29 जुलै 2026 रोजी हि प्रेसनोट काढण्यात आल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.