'राजीनामे स्वीकारू नका...'
इस्रोमधून शास्त्रज्ञ, अभियंत्यांची गळती रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो'मधून १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणाची आता सरकारने गंभीर दखल घेतली असून, यापुढे राजीनामे स्वीकारु नयेत, अशी सूचना इस्रोला करण्यात आली आहे.
'गगनयान' सारख्या महत्त्वाच्या मोहिमांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज स्वीकारू नयेत, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'ग्रुप ए' मध्ये मोडणाऱ्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून सूचना देण्यात आली आहे. सरकारच्या अंतराळ विभागाने शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज स्वीकारू असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. "असे दिसून आले आहे की, सध्या राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज 'ग्रुप ए'मधील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांकडून प्राप्त होऊ लागले आहेत. यात 'गगनयान' सारख्या महत्वाच्या मोहिमांसह इतर मोहिमांसाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा देखील समावेश आहे", असे सरकराच्या निवेदनात म्हटले आहे.
"गगनयानसारख्या महत्वाच्या मोहिमांसह देशाच्या इतर महत्वाच्या मोहिमांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज स्वीकारू नये, असा निर्णय घेण्यात आले आहे", असे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, अंतिम निर्णयासाठी शास्त्रज्ञांचा विनंती अर्ज अंतराळ विभागाकडे पाठविण्यात यावा, असेही सरकराने पुढे स्पष्ट केले आहे. "शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांकडून प्राप्त झालेला अर्ज संचालकांच्या शिफारसीसह अंतिम निर्णयासाठी अंतराळ अर्ज संचालकांच्या शिफारसीसह अंतिम निर्णयासाठी अंतराळ विभागाकडे पाठविण्यात यावा", असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
यू आर राव उपग्रह केंद्र आणि विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांना हे निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती आहे. देशातील इस्रोच्या विविध केंद्रातील जवळपास १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून इस्रोला निवदेनाद्वारे निर्देश दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. टाईम्सच्या वृत्तानुसार, यू आर राव उपग्रह केंद्र, कर्नाटक येथून जवळपास ८० शास्त्रज्ञ आणि केरळमधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातून २० शास्त्रज्ञांनी राजीनामा दिला आहे.
इस्रोमधून अनेक शास्त्रज्ञांनी राजीनामा दिल्यानंतर इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "खूप लोक गेलेत, पण प्रत्येक संस्थेत असं होत असतं. सरकारने पाठवलेले निवेदन शास्त्रज्ञांना रोखण्याचा प्रयत्न आहे, तसेच, एखाद्या मोठ्या मोहिमेला अचानक फटका बसू नये यासाठी देखील प्रयत्न केले जातात. पण, तरी देखील कोणी जात असेल तर, कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल, आम्ही या सगळ्याची काळजी घेत आहोत", असे नारायण टाईम्सशी बोलताना म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.