Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवण्याचा कट आखला गेलाय"

"आमच्या शांततापूर्ण आंदोलनात गुंड पाठवण्याचा कट आखला गेलाय"

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

कॉक्रोज जनता पार्टीने नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरु आहे.

शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरु आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. त्यांना सोनम वांगचुक यांचीही साथ लाभली आहे. सोनम वांगचुक हे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा १४ वा दिवस आहे. अशातच अभिजित दीपके यांनी एक पोस्ट लिहून आमचं आंदोलन गुंड पाठवून उधळण्याचा कट आखला जातोय असा आरोप केला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात ते म्हणतात की आम्हाला यंत्रणेतल्याच आमच्या काही सूत्रांनी माहिती दिली आहे की जंतर मंतर या ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या आंदोलनात गुंड पाठवून आम्हाला त्रास द्यायचा आणि आंदोलन उधळून लावायचं असा कट आखला जातो आहे. आम्ही संसदेवर जो मोर्चा काढणार आहोत त्याआधी आमचं शांततापूर्ण आंदोलन उधळण्यासाठी हे केलं जाणार आहे असं समजतं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ सुरु केली. त्यानंतर नीट पेपरफुटीविरोधात आवाज उठवला. आता त्यांनी थेट आमच्या आंदोलनात गुंड पाठवण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप आपल्या ट्वीटर पोस्टमधून केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये कुणाचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा हा रोख सरकारकडे आहे यात काहीच शंका नाही.

मागील महिन्यात देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणात बेरोजगार तरुणांची तुलना उपरोधाने 'कॉक्रोच' म्हणजेच झुरळाशी केली होती. सरन्यायाधीशांच्या याच विधानाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यावर उपरोधात्मक टीका करण्यासाठी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाचे एक डिजिटल हँडल सुरू करण्यात आलं होतं, या डिजिटल चळवळीला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चळवळीच्या माध्यमातून तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्याला थेट हात घातल्यामुळे अवघ्या चार दिवसांतच या डिजिटल हँडलचे फॉलोअर्स देशातील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाले. सोशल मीडियावरील या डिजिटल चळवळीला देशभरातील तरुणांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याने, आता या चळवळीने प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे रूप घेतले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.