Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डायल ११२ सेवेत सांगली पोलीस दल महाराष्ट्रात प्रथमअवघ्या ४ मिनिटांत मदत पोहोचवून रचला विक्रम

डायल ११२ सेवेत सांगली पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम
अवघ्या ४ मिनिटांत मदत पोहोचवून रचला विक्रम

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या सांगली पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या 'Emergency Response Support System (ERSS)' अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या 'डायल ११२' (Dial 112) या आपत्कालीन सेवेत जुलै २०२६ मध्ये सांगली पोलीस दलाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सांगली पोलिसांनी अवघ्या ०४ मिनिटे ११ सेकंदांच्या (04:11) सरासरी वेळेत आपत्कालीन घटनास्थळी पोहोचून ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

यापूर्वी विविध आपत्कालीन सेवांसाठी वेगवेगळे नंबर डायल करावे लागत होते; परंतु आता ११२ या एकाच क्रमांकावर संपर्क साधल्यास पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध होते. आधुनिक GPS प्रणाली, मोबाईल डेटा टर्मिनल (MDT) आणि नियंत्रण कक्षाच्या मध्यस्थीने सर्वात जवळ असणाऱ्या पोलीस वाहनाला (ERV/FRV) अलर्ट पाठवून जलद मदत पुरवली जाते.

१ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सांगलीच्या डायल ११२ नियंत्रण कक्षाला एकूण ३,३४१ कॉल्स प्राप्त झाले होते. या सर्व कॉल्सवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात आली असून एकही कॉल प्रलंबित (Pending) ठेवण्यात आलेला नाही. ०४:११ मिनिटांची प्रतिसाद वेळ (Response Time) ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरली आहे.

सक्षम मार्गदर्शन आणि यश
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि डायल ११२ नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी बयाजीराव कुरळे (पोलीस निरीक्षक) यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साध्य झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.