Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत यलो व ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत यलो व ऑरेंज अलर्ट

मुंबई : खरा पंचनामा 

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्र विभागासाठी ऑरेंज अलर्ट आणि मराठवाडा विभागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात काल सकाळपासून पाऊस झालेला नाही. राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, आणि गोंदियात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून राज्यातील ६ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सातारा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.