Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी अंदुरेला जामीन, शिक्षेबाबतही कोर्टाचा मोठा आदेश

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी अंदुरेला जामीन, शिक्षेबाबतही कोर्टाचा मोठा आदेश

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरे याला मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. त्याशिवाय, जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंहा भोसले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला देखील जामीन मंजूर झाला आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या घटनाक्रम
२० ऑगस्ट २०१३ - डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या
३० ऑगस्ट २०१३- सुमारे आठ कोटी फोन कॉल्स व इ मेल्सची तपासणी
२ सप्टेंबर २०१३ - रेखाचित्र तयार व १७ संशयित ताब्यात
१९ डिसेंबर २०१३ - गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याच्या
मनीष नागोरी व विकास खंडेलवाल याना अटक
१३ मार्च २०१३ - नागोरी व खंडेलवाल यांची ओळखपरेड
९ मे २०१४ - केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) तपास वर्ग
३१ डिसेंबर २०१८- सनातन प्रभातच्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या व
पुण्याच्या सारंग अकोलकरच्या घरावर छापा
१०जून २०१६ - डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक
१४ जून २०१६ - या गुन्ह्याचा सूत्रधार तावडे असल्याचा दावा
15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात
खटल्याला सुरुवात
पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र
10 मे 2024 खटल्याचा निकाल, दोघांना जन्मठेप तर तिघांची निर्दोष सुटका

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.