Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भाजपचा झेंडा, सामाजिक कार्यकर्त्यांचं अन्नत्याग आंदोलन

राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भाजपचा झेंडा, सामाजिक कार्यकर्त्यांचं अन्नत्याग आंदोलन

अंबरनाथ : खरा पंचनामा 

पूर्वेतील वडवली परिसरात राष्ट्रध्वजासाठी उभारलेल्या अधिकृत ध्वजस्तंभावर एका पक्षाचा ध्वज लावल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मनोज फलके यांनी केला आहे. संबंधित पक्षध्वज हटवून राष्ट्रध्वज फडकवावा आणि याप्रकरणी जबाबदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी फलके यांनी शुक्रवार (ता. ७) पासून अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

वडवली विभागातील शिवसेना शाखेजवळ नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवर राष्ट्रध्वजासाठी अधिकृत ध्वजस्तंभ उभारला आहे. या ध्वजस्तंभावर भाजपचा पक्षध्वज लावला असून प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात फलके यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसेच अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. पोलिस प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन अंबरनाथ नगरपालिकेला कारवाई करण्याबाबत पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांचे पत्र मिळून चार महिने उलटूनही पालिकेकडून प्रत्यक्ष कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.