Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'जमत नसेल तर काम सोडून द्या'FDA अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा थेट इशारा

'जमत नसेल तर काम सोडून द्या'
FDA अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा थेट इशारा

मुंबई : खरा पंचनामा 

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपदी तुकाराम मुंढे विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी जी धडक कारवाई सुरु केली आहे. त्यानंतर राज्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पणदुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंविरोधात तक्रार केली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे या अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तक्रार केली आहे.

एका मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील अधिकाऱ्यांना थेट नोकरी सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. या मुलाखतीत तुकाराम मुंढे म्हणाले की, नियमाप्रमाणेच सर्वांना काम करावं लागेल. जमत नसेल तर काम सोडून द्यावं. तसंच अधिकाऱ्यांनी ऐकलं नाहीतर तर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

तुकाराम मुंढे म्हणाले की, त्यांना आठवड्याची एक सुट्टी आहे. पण त्यांची मागणी आहे की, बाकीच्या शासकीय कार्यालयानुसार 10 ते 6 या वेळेत सुरु ठेवा. शिवाय बाकीच्या सुट्ट्या पण द्या. एक गोष्ट लक्षात घ्या ते कार्यालय नाही आहे, लॅब आहे. लॅबचे नियम वेगळे आहेत आणि कार्यालयाचे नियम वेगळे आहेत. लॅबमधील अधिकाऱ्यांनी लॅबच्या नियमानुसार काम करायचं आहे. 48 तासाच्या वरती कोणी काम दिलेलं नाही. ना त्यांना आठ तासांच्या वरती काम दिलं आहे. पूर्वी त्यांना दहा ते सहाची सवय होती. म्हणून त्यांची ती मागणी आहे. त्यांना मी समजवलंय. यातून समजलं तर ठीक नाहीतर जे काही नियमानुसार पद्धत आहे, त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करता येईल. कारण लॅब जे आहे, ते लॅब सारखं काम आहे, त्यांना रिक्रुटमेंट लॅब साठी करण्यात आलं आहे. मग ते लॅब असिस्टंट असेल टेक्निकल ऑफिसर असतील किंवा सायंटिफिक ऑफिसर असतील जे कोणी असेल लॅब प्रमाणे काम करायचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले की, तुम्हाला नियमाप्रमाणे काम करावं लागेल. नियम तुम्हाला 48 तासाच्या वरती काम करा असं कोणी देत नाहीय. दिवसातील आठ तासांच्या वरती काम करा असं म्हणत नाहीय. ज्यांना काम करायचं नाहीय त्यांनी सोडून द्या. जर त्यांना पगार पाहिजे आणि ज्या कामासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे तेच काम करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही काम सांगत नाहीय.

अधिकाऱ्यांनी पत्रात तक्रार केली की, त्यांना 15 जुलै रोजी एक निवेदन पाठवण्यात आलं. ज्यात सांगितलंय की, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. यात अधिकाऱ्यांनी मागणी केली की, शासन निर्णयानुसार प्रयोगशाळेची कार्यालयीन वेळ पूर्ववत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी लागू करण्यात यावी. तसंच दोन शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करा. इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे प्रयोगशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शनिवार व रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळावा.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.