Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिजीत दिपकेंचा आता PM Cares फंडाकडं मोर्चा ! जनतेचा ८,४०० कोटींहून अधिकचा पैसा पडून

अभिजीत दिपकेंचा आता PM Cares फंडाकडं मोर्चा ! 
जनतेचा ८,४०० कोटींहून अधिकचा पैसा पडून

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी यशस्वीरित्या देशव्यापी आंदोलन उभारलं आहे. सातत्यानं ते या ज्वलंत विषयावर नव्या कल्पनांसह रस्त्यावर उतरत आहेत. नीट परीक्षेतील अनागोंदीची जबाबदारी निश्चित करुन त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. त्यानंतर सध्या देशभरातील सरकारी शाळांच्या दुरावस्था चव्हाट्यावर आणून सरकारला जाब विचारत आहेत. या उपक्रमालाही तुफान प्रतिसाद लाभल्यानंतर आता त्यांच्या टीमनं पंतप्रधानांच्या अखत्यारित असलेल्या PM Cares फंडात पडून असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा शिक्षणाच्या कामात विनियोग व्हावा अशी मागणी केली आहे.

अभिजीत दिपके यांनी व्हिडिओ संदेशामार्फत पीएम केअर्स फंडाबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "काल एक बातमी आली होती की, पीएम केअर्स फंडात ८,५०० कोटी रुपये पडून आहेत. ज्यांचा कुठेही वापर होत नाहीए, त्याचा कुठेही वापर झालेला नाही. एकीकडं कोट्यवधी रुपये पडून आहेत, तर दुसरीकडं आपण पाहतोय या देशातील विद्यार्थी शाळेला चांगला रस्ता नाही, शाळेत बसायला चांगले बेंच नाहीत, शाळेत पिण्याचं पाणी नाही म्हणून रडत आहेत. मग हा पीएम केअर्स फंडात पडून असलेला पैसा आपण त्या मुलांच्या शाळांसाठी का खर्च करत नाही? हा पैसा नव्या शाळा तयार करण्यासाठी का वापरला जात नाही? जर आपण एक चांगली शाळा बनवण्याचा खर्च अंदाजे ८ कोटी रुपये पकडला ज्यात सर्व सुविधा उपलब्ध असतील हे एक मॉडेल स्कूल असेल. तर पीए केअर्स फंडात पडून असलेल्या ८,५०० कोटी रुपयांमध्ये १,००० हून अधिक नवीन हायटेक 'मॉडेल स्कूल' बनवले जाऊ शकले असते पण हे होताना दिसत नाही"

"आता मी गेल्या काही दिवसांत गावातील शाळा पाहून आलो तिथं परिस्थिती खूपच बिकट आहे. मी तिथं अधिकाऱ्यांना विचारलं की, इथं पायाभूत सुविधा देखील का नाही? त्यावर त्यांनी सांगितंल की, आम्हाला निधीच उपलब्ध होत नाही.

त्यामुळं एकीकडं सांगितलं जातंय की पैसा उपलब्ध नाही आणि दुसरीकडं पीएम केअर्स फंडात साडेआठ हजार कोटी रुपये पडून आहेत. त्यामुळं हा पैसा तुमच्या छोट्या भाऊ-बहिणींसाठी का वापरला जाऊ नये? तुमच्या मुलांच्या शाळांसाठी हा पैसा का वापरला जाऊ नये? त्यामुळं लोकांनी आता पंतप्रधानांना विनंती करावी की, पीएम केअर्स फंडातील पैसा लोकांसाठी, शिक्षणासाठी आणि गरिबांच्या मुलांच्या शाळांसाठी वापरा. कारण पीए केअर्स फंड हा राष्ट्रीय आणीबाणीसाठी आहे आणि देशातील सध्याची सरकारी शाळांची व्यवस्था ही यापेक्षा वेगळी नाही. त्याचबरोबर पंतप्रधानांनी देखील हे दाखवून द्यावं की त्यांना खरंच या सर्व गोष्टींची केअर (काळजी) आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.