उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद राहणार?
मुंबई : खरा पंचनामा
देशभरातील बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच संघ असणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने बँकिंग क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. संबंधित संप स्थगित करण्याबाबत सरकार आणि बँक यूनियन यांच्यात चर्चा झाली मात्र आवश्यक तोडगा न निघल्याने गुरुवार 10 सप्टेंबर सकाळी 12 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार, 11 सप्टेंबरचा संप निश्चित मानला जात आहे.
5 दिवसांचा बँकिंग कामाचा आठवडा आणि इतर मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे. त्यामुळे जोपरेनत सरकार याबाबत ठोस निर्णय घेत नाही आणि अंमलबजावणीसाठी निश्चित मुदत ठरवत नाही तोपर्यंत 11 सप्टेंबरचा संप मागे घेण्याचा प्रश्न येत नाही असे यूनियनचे म्हणणे आहे. यात विशेष बाब म्हणजे हा संप सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी केला असून उद्या फक्त सरकारी बँकाचे कामकाज प्रभावित होऊ शकते.
11 तारखेला जर संप झाला तर बँकामधील कोणतेही फिजिकल काम होणार नाही मात्र डिजिटल बँकिंग, UPI आणि ATM सारख्या काही सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे तुम्हाला जर बँकेत जायचे असेल तर याबाबत आधी माहिती घ्या आणि मग घराबाहेर पडा.
बँक यूनियनने दिलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर 2026 रोजी देशव्यापी बँक संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार या दिवशी देसभरातील सरकारी बँकेतील कर्मचारी कामाला येणार नाहीत. जर 11 तारखेला बँका बंद राहिल्या तर त्यानंतर 12 आणि 13 सप्टेंबरला शनिवार-रविवार असल्याने बँकांच्या नियमित सुट्ट्या असतील. तर सोमवार 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने बँका बंद असणार आहे. त्यामुळे 11 ते 14 सप्टेंबर असे सलग 4 दिवस बँका बंद राहतील.
11 सप्टेंबरनंतर 28, 29 आणि 30 सप्टेंबर 2026 रोजी पुन्हा तीन दिवसांचा देशव्यापी संप करण्याची घोषणाही या संघटनेने केली आहे. त्यामुळे 26 आणि 27 सप्टेंबरच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांसह काही ठिकाणी सलग 5 दिवस बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
बँक यूनियन स्पष्ट केले आहे की त्यांच्या मागण्यांवर जर सरकारकडन यावेळी कोणता तोडगा न निघाल्यास 26 ऑक्टोबर
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.