Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुष्काळाच्या बैठकीत काजू बदाम खाल्लं तर काय होतंय? मी पण माणूसच आहे... बंडू बॉस पत्रकारांवरच खवळले

दुष्काळाच्या बैठकीत काजू बदाम खाल्लं तर काय होतंय? मी पण माणूसच आहे... बंडू बॉस पत्रकारांवरच खवळले

नांदेड : खरा पंचनामा 

दुष्काळाच्या बैठकीत काजू बदाम खाण्याच्या प्रश्नावरून खासदार संजय जाधव चांगलेच संतापले. मी पण शेवटी माणूसच आहे, काजू बदाम खाल्ले तर काय होतंय...? माझ्यावर टीका होऊ द्या, त्याची चिंता तुम्ही करू नका.. असे म्हणत परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव पत्रकारांवरच संतापले.

नांदेडमधील दुष्काळी आढावा बैठकीत नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू बदामावर ताव मारला. प्रामुख्याने परभणीचे खासदार संजय जाधव हे काजू बदाम खात असताना व्हिडीओमध्ये कैद झाले. दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना नेतेमंडळी काजू बदाम खात असल्याचे पाहून शेतकरी नेते संतापले. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी खासदार बंडू जाधव यांना विचारले असता ते पत्रकारांवरच खवळले.

खासदार आमदारांसमोर प्लेट ठेवलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही काजू बदाम खाल्ले... कुणाला भूक लागली असेल आणि त्याने प्लेटमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ले तर कुणाला काय अडचण आहे? दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का? असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला.

बैठकीत खायला काय ठेवावे, हा प्रशासनाचा विषय आहे. पुढाऱ्यांपैकी कोणी काही मागितले नव्हते. काजू बदाम का ठेवले, हे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारा. काजू बदाम ठेवा, हे त्यांना मंत्र्यांनी सांगितले होते का? असे सवाल त्यांनी माध्यमांना विचारले. माध्यमांनी छोटे विषय मोठे करू नयेत. दुष्काळाचे वार्तांकन करावे, राईचा पर्वत करू नये, असा शहाजोग सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेत आज नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठक सुरू आहे. या दुष्काळी बैठकीत मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी काजू बदामावर ताव मारला. बैठकीसाठी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्यासह नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित आहेत. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत चर्चा सुरू आहे. एकीकडे दुष्काळावर चर्चा तर दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी काजू बदाम खात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.