Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मुख्य आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये जखमी; पायावर लागली गोळी !

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मुख्य आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये जखमी; पायावर लागली गोळी !

जमूई : खरा पंचनामा 

बिहारच्या जमुई जिल्ह्यात १९ सप्टेंबरच्या संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. कोचिंग क्लासवरून घरी जात असताना एका अल्पवयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला अडवून काही टोळक्यांनी त्यांचा विनयभंग करून चित्रीकरण केले होते.

सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहार सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करताना त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती हाती येत आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार उपमहानिरीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की, दोन आरोपींवर गोळ्या झाडण्यात आल्या. दोन्ही आरोपींचे वय २५ आहे. आरोपी हायवेलगत असलेल्या झुडुपांमध्ये लपून बसले होते. त्यांच्या जवळ पोलीस पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार करावा लागला.

आरोपी नंदन यादव पळून जात असताना त्याच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या. ही जखम किती गंभीर आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला रुग्णालयात आणले गेले तेव्हा चालताही येत नव्हते. पीटीआयने यासंबंधीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, विनयभंग प्रकरणात महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक सर्व आरोपींना जेरबंद करण्यासाठी विविध ठिकाणी छापे घातले.

जमुईमधील संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी बिहार सरकार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर जोरदार टीका केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दुरवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला. तर आम आदमी पक्षाने पंतप्रधान मोदी यांना बेटी बचाओ घोषणीची आठवण करून दिली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवरून सरकारवर हल्लाबोल केला. "बिहारच्या जमुई येथील व्हिडीओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला आणि मुलीला रस्त्यावर बळजबरीने अडवण्यात आले. त्यांना त्रास देऊन त्यांचा अपमान करण्यात आला, त्या मुलीची छेडछाड करण्यात आली. ती मुलगी हात जोडून आपल्याला सोडून देण्याची विनवणी करत होती, तरीही त्या गुंडांनी तिच्याशी झटापट केली. या लोकांना इतक्या उद्धटपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला? ही पितृसत्ताक मानसिकता आहे", अशा शब्दांत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.