दिशा सालियन मृत्यू प्रकरण : मोबाईल जप्ती आणि डेटाशी छेडछाडबाबत सीबीआयच्या एफआयआरमध्ये 'मोठ्या विसंगती'
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर बारा दिवसांनी या केंद्रीय तपास संस्थेने आज (14 सप्टेंबर) एफआयआर नोंदवून तपास सुरू केल्याची घोषणा केली.
सीबीआयने दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. मात्रदिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित सीबीआयच्या एफआयआरमध्ये तिच्या मोबाईल फोनबाबत 'मोठ्या विसंगती' असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, दिशा सालियनचा तत्कालीन मंगेतर रोहन राय याचे जबाब तसेच एका मुलाखतीतील विधानांच्या आधारे पोलिसांनी 9 जून 2020 रोजी सकाळी 9.40 वाजता दिशाचा मोबाईल फोन ताब्यात घेतला होता. मात्र, फोन जप्त करूनही त्यानंतरच्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की, तिचा मोबाईल सक्रीय होता आणि त्यानंतरही त्याचा वापर सुरू होता.
जेव्हा ही बाब समोर आली, तेव्हा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले की, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या दोन घटनांमध्ये काही संभाव्य संबंध आहे का? हे तपासण्यासाठी दिशाच्या फोनचा पुन्हा वापर करण्यात आला होता. मात्र, तक्रारदार दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या मते, पोलिसांचे हे स्पष्टीकरण उपलब्ध नोंदींशी जुळणारे नव्हते.
सीबीआयच्या एफआयआरमध्ये पुढे असाही आरोप करण्यात आला आहे की, फोनच्या सुरुवातीच्या जप्तीशी संबंधित नोंदी दडपल्या गेल्या किंवा नष्ट केल्या गेल्या आहेत. त्यानंतर, फोन जप्त करण्याच्या वेळेबाबत आणि परिस्थितीबाबत परस्परविरोधी तपशील अधिकृत नोंदींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी सीबीआयकडे असा गंभीर आरोप केला आहे की, दिशाचा मोबाईल फोन प्रत्यक्षात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि आदित्य ठाकरे यांच्या ताब्यात होता आणि तेच त्याचा वापर करत होते.
एफआयआरमध्ये नोंदवलेल्या विधानानुसार, दिशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनांबाबत तिने ज्या व्यक्तींशी माहिती शेअर केली होती, त्यांची ओळख पटवण्यासाठी तिच्या फोनचा शेअर केली होती, त्यांची ओळख पटवण्यासाठी तिच्या फोनचा वापर करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार ठरू शकणाऱ्या किंवा कथितरित्या यात सामील असलेल्या लोकांसाठी धोका निर्माण करू शकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठीही या मोबाईलचा वापर करण्यात आला.
एफआयआरमध्ये असाही आरोप आहे की, दिशाच्या मोबाईल डेटाद्वारे संभाव्य साक्षीदारांची ओळख पटल्यानंतर, त्यांना एकतर संपवण्यात आले, धमकावण्यात आले, बळजबरी करण्यात आली किंवा त्यांच्याकडील माहिती उघड करण्यापासून रोखण्यात आले. तसेच, पुरावे नष्ट करण्यासाठी दिशाच्या मोबाईल फोनवरील महत्त्वपूर्ण डेटा पाहिला गेला, तो डिलीट केला गेला, त्यात फेरफार केले गेले किंवा छेडछाड केली गेली, असाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी (13 सप्टेंबर) दाखल करण्यात आलेला सीबीआयचा एफआयआर सतीश सालियन यांच्या जबाबावर आधारित आहे. एफआयआरमधील तपशिलानुसार, या टप्प्यावर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद केलेले नाही. कारण 2 सप्टेंबरच्या आपल्या आदेशात उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, जोपर्यंत तपास अधिकाऱ्यांना एखाद्या व्यक्तीविरुद्ध संशय निर्माण करण्यासाठी पुरेसे पुरावे सापडत नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीला आरोपी मानले जाऊ नये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.