Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील युट्यूबर आणि सामाजिक प्रश्न सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून मांडणारे संतोष पंडित यांना आक्षेपार्ह भाषा वापरल्या प्रकरणी अटक झाली होती. १४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या संतोष पंडित यांनी पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर जोरदार टीका केलीय.

तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाला सवाल केले आहेत.

पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होतात. या अपघातांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर किती वेळा कारवाई झाली असा प्रश्न पंडित यांनी उपस्थित केला. खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या व्हिडीओतून म्हटले आहे.

मला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर ज्या रस्त्याने नेलं त्याच रस्त्यात हा खड्डा आहे. याच खड्ड्यातून पोलिसांची गाडी गेली असं म्हणत संतोष पंडित यांनी खड्ड्याच्या समोर फुलांचा हार ठेवला. त्यांच्या या व्हिडीओवरही नागरिकांनी कमेंट करत रस्त्याच्या दुरवस्थेवर टीका केलीय.

विशेष म्हणजे, यावेळी संतोष पंडित यांनी सौम्य भाषेत आपली भूमिका मांडली आहे. संबंधित रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश महापौर किती वेगाने देतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात काम होते की नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रस्ता दुरुस्त न झाल्याने पुन्हा अपघात झाल्यास पोलिसांकडून कोणावर कारवाई केली जाते, असा सवालही त्यांनी केला आहे.

यापूर्वी एका व्हिडीओमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपावरून संतोष पंडित यांना अटक झाली होती. ३ सप्टेंबरला रात्री उशिरा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यानंतरही सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत राहणार असल्याचे पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.