परीक्षेत 'चॅटजीपीटी' वापरून कॉपी करताना पकडल्यानंतर आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबई : खरा पंचनामा
आयआयटी बॉम्बेमधील 'एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग' विभागातील दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला आणि या प्रकरणाशी संबंधित परिस्थितीचा तपास सुरू केला. मात्र विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कॅम्पसमध्ये जमा झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात निदर्शने सुरू केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी परीक्षेत मोबाईल फोनचा वापर करताना पकडला गेला होता. परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्याने प्रश्नपत्रिका 'चॅटजीपीटी' (ChatGPT) या एआय (AI) टूलवर अपलोड केली होती. कॉपी करताना पकडल्यानंतर संस्थेने त्या विद्यार्थ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नव्हती. या घटनेनंतर संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी (HoD) त्या विद्यार्थ्याशी संवाद साधला होते. त्यांनी त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या भविष्यातील शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली. शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीवर परतला होता. मात्र, आज संध्याकाळी तो आपल्या खोलीत मृत अवस्थेत आढळला.
विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कॅम्पसमध्ये जमा झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात निदर्शने सुरू केली. विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आणि या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र परीक्षेदरम्यान घडलेली घटना आणि विद्यार्थ्याची आत्महत्या यांचा काही संबंध आहे का? हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता पोलीस आणि आयआयटी बॉम्बेचे प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आयआयटी बॉम्बेमध्ये यावर्षी याआधीही दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. पहिली घटना 4 फेब्रुवारी 2026 रोजी घडली. सिव्हिल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या नमन अग्रवाल या 21 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृह क्रमांक 4 च्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तर दुसरी घटना 29 जुलै 2026 रोजी घडली होती. सोहिल राजकुमार सांगवान या 20 वर्षीय मटेरियल सायन्सच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृह क्रमांक 4 मधील आपल्या खोलीत गळफास लावून जीवन संपवले. प्राथमिक तपासात कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.