Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिशा सालियनचे वडील CBI ला देणार 'तो' पेनड्राईव्ह, प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या?

दिशा सालियनचे वडील CBI ला देणार 'तो' पेनड्राईव्ह, प्रकरणात नवा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या?

मुंबई : खरा पंचनामा 

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला आता नवे वळणावर आले असून दिशाचे वडील सतीश सालियन आता केंद्रीय अन्वेषण विभागाला एक अत्यंत महत्त्वाचा पेनड्राइव्ह सुपूर्द करणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBI कडे हस्तांतरित झाला असून, तपासाला गती देण्यासाठी दिल्लीहून विशेष अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. उद्या दुपारी 2 वाजता सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा हे CBI अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित काही खळबळजनक आणि महत्त्वाचे पुरावे CBI कडे सोपवले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सतीश सालियन यांनी केलेल्या दाव्यांनुसार, CBI ला देण्यात येणाऱ्या पेनड्राईव्हमध्ये एका प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ जबाब रेकॉर्ड करण्यात आला आहे. या व्हिडिओ जबाबात 8 जून 2020 च्या रात्री घटनास्थळी शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि इतर काही हाय-प्रोफाइल व्यक्ती उपस्थित होत्या आणि त्यांचा या घटनेत थेट सहभाग होता, असा दावा करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर प्रत्यक्षदर्शीची आणि या प्रकरणातील गंभीर माहिती असलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची यादी तसेच तपशील CBI ला सादर केला जाणार आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या चौकशीची मागणी सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मूळ पुरावे दाबण्याचा आणि तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांचा स्वतंत्र जबाब नोंदवून त्यांनी त्यावेळी केलेल्या दाव्यांची आणि पोलीस तपासातील विसंगतींची निष्पक्ष पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सतीश सालियन CBI कडे करणार आहेत. 8 जून 2020 रोजी मालवणी (मालाड) येथील एका बहुमजली इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली पडल्याने दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले होते.

तपासातील त्रुटी आणि संशयास्पद बाबींवर बोट ठेवत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी CBIकडे सोपवण्याचे आदेश दिले. आता सतीश सालियन यांनी सादर केलेल्या या नव्या व्हिडिओ पुराव्यांमुळे CBI च्या तपासाची दिशा काय ठरते आणि राजकीय वर्तुळात याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.