मालकानं नोकरीवरुन काढलं, राग झाला अनावर, कर्मचाऱ्याने थेट गॅरेजलाच लावली आग, 20 दुचाकी जळून खाक, लाखो रुपयांचा फटका
नागपूर : खरा पंचनामा
नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅरेज मालकाने नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून एका माजी कर्मचाऱ्याने अत्यंत खळबळजनक कृत्य केलं आहे. माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या गॅरेजला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनीत घडली आहे. या भीषण आगीत गॅरेजमधील 20 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळं नागपुरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस तात्काल घटनास्थळी रवाना झाले होते. यानंतर पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही देखील चेक केले आहेत. या आधारे आरोपी आग लावत असताना दिसत आहे. पोलीस त्या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
सतीश यादव यांच्या 'दिवेश होंडा सर्व्हिस' गॅरेजमध्ये राजू महेंद्रकर नावाचा व्यक्ती कामाला होता. त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे सतीश यांनी दोन महिन्यांपूर्वी कामावरून काढले होते. याचाच राग मनात धरुन राजूने गॅरेजला आग लावल्याचा आरोप आहे. आगीच्या तीव्र झळांमुळे गॅरेजच्या शेजारील डॉ. विकास गिरी यांच्या क्लिनिकचेही 2 लाखांचे नुकसान झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात संशयित आरोपी आग लावताना दिसत आहे. पोलीस या फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेनं नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मालकानं कामावरुन काढून टाकल्याचा राग कर्मचाऱ्याला अनावरण झाल्यानं त्याने हे कृत्य केल्याची प्राथणिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेचा सविस्तर तपास पोलीस प्रशासन करत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.