डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश
सांगली : खरा पंचनामा
तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कसबे डिग्रज येथील डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, फलटण यांच्या वतीने असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (महाराष्ट्र शाखा) यांच्या सहकार्याने 'INNOPHARMA-2.0 – Think, Innovate & Transform' या द्वितीय राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हर्षदा सुनील मुधाळे आणि विवेक शशिकांत गायकवाड यांनी 'VIDYATECH – Pharmacist AI Assistant' हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत ५५ महाविद्यालयांमधील एकूण २२० पोस्टर्स सादर करण्यात आली होती. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना ७ हजार रुपये रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आंबप येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसीच्या श्रुती लालासो पाटील आणि आरती किरण कदम यांनी 'Pharma Best From Waste' हे पर्यावरणपूरक मॉडेल सादर करून द्वितीय क्रमांक मिळविला. टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून उपयुक्त वस्तू तयार करण्याच्या या संकल्पनेचे विशेष कौतुक झाले. या यशाबद्दल त्यांना २ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या यश बद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, संस्थापक प्रा. डी. डी. चौगुले, प्राचार्य डॉ. किरण वाडकर आणि डिप्लोमा विभागाचे प्रमुख चंद्रकांत भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे संचालक पोपटराव डोर्ले, अजितप्रसाद पाटील, मिलिंद भिलवडे, महावीर चौगुले, प्रशांत अवधूत, डॉ. बाळासाहेब चोपडे, अजित फराटे, नितीन चौगुले आणि सुदर्शन शिरोटे उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.